Vande Bharat Metro Train Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन धावणार, तिकीट किती? कुठे थांबणार?

Nagpur Pune Nagpur : नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशी जास्त आणि रेल्वे कमी आहेत, त्यामुळे वंदे भारत ट्रेन आल्यास मोठा फायदा होऊ शकतो.

Namdeo Kumbhar

Vande Bharat trains : नागपूरला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवलाय. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यामार्गावर स्लीपर वंदे भारत मिळावी म्हणून हा प्रस्ताव पाठवल्याचे समोर आलेय.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकारी (डीआरएम) विनायक गर्ग यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वंदे भारत ट्रेन विषयी दुजोरा दिलाय. विनायक गर्ग यांनी रेल्वे नेटवर्कमध्ये नागपूरचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले होते. ते म्हणाले, “नागपूर विभाग प्रवाशांच्या रेल्वेच्या नेटवर्क वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जवळपास 125 हून अधिक गाड्या नागपूर स्थानकातून धावतात. लवकरच नागपूरवरून वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे.

नागपूरवरून सध्या कोणत्या वंदे भारत धावतात? Current Vande Bharat services from Nagpur:

• नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Secunderabad Vande Bharat Express

• नागपूर -इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Indore Vande Bharat Express

• नागपूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Bhopal Vande Bharat Express

कोणत्या नव्या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता ? Proposed new routes:

• नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Pune Vande Bharat Express

• नागपूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Mumbai Vande Bharat Express

नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशी जास्त आणि रेल्वे कमी आहेत, त्यामुळे वंदे भारत ट्रेन आल्यास मोठा फायदा होऊ शकतो. नागपूर-पुणे या मार्गावर मर्यादीत ट्रेन असल्यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करतात. जर आरामदायी वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा कल याकडे जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेळेची बचत होणार आहे.

नागपूर-पुणे, सध्या रेल्वे कोणत्या आहेत? At present, Nagpur-Pune connectivity is limited to:

• नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस (आठवड्यातून तीन वेळा) Nagpur-Pune Superfast Express

• गरीब रथ एक्स्प्रेस (आठवड्यातून तीन वेळा) Garib Rath Express (3 times a week)

• हमसफर (आठवड्यातून एकवेळा) Humsafar Express (once a week)

• आझाद हिंद एक्सप्रेस आणि हातिया-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस Azad Hind Express & Hatia-Pune Superfast Express.

नागपूर आणि मुंबई या मार्गावर फक्त दोन ट्रेन धावतात. त्यामध्ये विदर्भ एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.

नागपूर-पुणे वंदे भारत सुरू झाल्यास कोणता थांबा मिळणार?

नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्याप नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनच्या तिकिटासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मर्यादीत रेल्वे असल्यामुळे प्रवाशांना तिकिट मिळत नाहीत. त्यामुळे ते रस्ते मार्गाने प्रवास करतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल. वंदे भारत एक्सप्रेस इतर ट्रेनच्या तुलनेत वेगवान आणि आरामदायी आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, मोठा नेता उपमुख्यमंत्र्यांच्या गटात जाण्याच्या तयारीत

'तू खूप क्यूट आहेस' म्हणाला अन्...; स्कूल बसचालकाचं 9 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य|VIDEO

Chanakya Niti : चाणक्यांच्या या ३ गोष्टी समजून घ्या, संसार कधीच मोडणार नाही

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT