तन्मय टिल्लू
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे व सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न बाजूला ठेऊन वेगळाच वाद समोर येत आहे. त्यातच, उपराजधानी नागपूरमध्ये काल दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी होणारं शहर आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद नागपूर पेटण्यापर्यंत गेला. मात्र नागपूरात दंगल कशी पेटली? दिवसभरात काय घडलं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
दंगलीचा घटनाक्रम, काय घडलं नागपुरात?
वेळ - सकाळी 7.00 वाजता
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी
सकाळी 11.30 वाजता
औरंगजेब कबर हटवण्याच्या मागणीसाठी महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन.. आंदोलनादरम्यान औरंगजेबाच्या प्रतीकात्मक कबरीला हिरवी चादर घालून दहन
दुपारी 1.00 वाजता
पुतळ्यापासून 100 मीटर अंतरावर मस्जिद, दुपारच्या नमाजनंतर मुस्लिम जमाव एकवटला, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी..पोलिसांचा कडक बंदोबस्त.
संध्याकाळी 7.00 वाजता
संध्याकाळच्या नमाज पठणानंतर मुस्लिम समाज आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल परिसरात जमायला सुरुवात
संध्याकाळी 7.30 वाजता
दोन्ही जमाव समोरासमोर,,परिस्थिती तणावपूर्ण
रात्री 8.00 वाजता
जमाव आक्रमक..पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या
भालधारपुरा परिसरात दगडफेक,दोन जेसीबी पेटवले
रात्री 8.30 वाजता
जमाव पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर.. परिस्थिती चिघळली..34 पोलीस जखमी..जमाव हिंसक
रात्री 9.00 वाजता
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न
रात्री 10.00 वाजता
मुंबईत सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक ..नागपुरमधील हिंसक जाळपोळीचा आढावा, शांततेचं आवाहन
रात्री 10:40 वाजता
पोलिसांचं नियंत्रण..कोम्बिंग ऑपरेशन सुरु,50 जण ताब्यात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.