nagpur crime Saam tv
महाराष्ट्र

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

nagpur crime : उधारीच्या पैशांवरून वाद झाला. उधारीवरून नागपुरात वेगवेगळ्या घटनेत दोघांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

नागपुरात दोन हत्येच्या घटना

उधारीच्या पैशाच्या वादातून हत्येचा थरार

गिट्टीखदानमध्ये १० हजारांच्या वादातून एकाची हत्या

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर शहर दोन हत्येच्या घटनेने हादरलंय. नागपुरात उधारीच्या पैशाच्या वादातून शहरात दोन ठिकाणी हत्येचा थरार घडला. पहिली घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. यात ११०० रुपयांसाठी युवकाची हत्या करण्यात आली.बेसा–मानेवाडा रोडवरील पानठेल्यासमोर घटना घडली. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून सीसीटीव्ही कैद झाली. तर दुसरी घटना गिट्टीखदान परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजनी परिसरात एक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर योगेश आणि उधारी देणाऱ्या अल्पवयीन तरुणामध्ये वाद उफाळला. अल्पवयीन तरुणाने उधारीचे पैसे मागत योगेश धक्काबुक्की केली. यावरून तणाव वाढला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने चाकूने सपासप वार केले.

आरोपीने योगेशच्या छाती, कंबर आणि मानेवर वार केले. यात योगेश गंभीर जखमी झाला. जखमी योगेशला तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना गिट्टीखदान परिसरात १० हजारांच्या वादातून घडली. हर्षु उर्फ गुड्डू पांडे याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. आरोपीने पांडेच्या डोक्यात वार केले. जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या पांडेला मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर फॉरेन्सिक पथकासह पोलीस दाखल झाले.

या प्रकरणानंतर मुख्य आरोपीसह साथीदार फरार गिट्टीखदान पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. पैशाच्या वादातून गुन्हेगारी वाढते असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हत्येच्या घटनेमुळे रात्रीच्या वेळी शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT