Nagpur : अवैध विक्रीसाठी जाणारा रेशनचा माल पकडला! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur : अवैध विक्रीसाठी जाणारा रेशनचा माल पकडला!

नागपूर च्या तहसील पोलिसांना राशनचे धान्य अवैधरित्या विक्रीसाठी बाजारात घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात यश आलं असून 70 गोण्यांमध्ये मध्ये 3 क्विंटल तांदूळ आढळून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : नागपूर च्या तहसील पोलिसांना राशनचे धान्य अवैधरित्या विक्रीसाठी बाजारात घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात यश आलं असून 70 गोण्यांमध्ये मध्ये 3 क्विंटल  तांदूळ आढळून आला आहे. हा माल जप्त करून अन्न व औषध विभागाला माहिती देण्यात आली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांच्या हक्काचे राशन मधील धान्य अवैध रित्या बाहेर विकण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

हे देखील पहा :

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात धान्य जप्त केले होते. आता पुन्हा तहसील पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार समोर आला. रात्रीच्या वेळी अंबाझरी कडून एक ट्रक वर्धमाननगर कडे जाताना दिसून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असतात त्यात राशन चा तांदूळ दिसून आला.

चालकाकडे कागद पत्रांची विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलीही कागद पत्रे नसल्याने पोलिसांनी तो माल जप्त करत अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती दिली आहे. अन्न प्रशासन विभाग आता याची चौकशी करत आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सणासुदीच्या दिवसात सरकार कडून स्वस्त धान्य नागरिकांना उपलब्ध करून देते. मात्र, यात मध्यस्थी करणारे  दलाल अश्या प्रकारे गरिबांच्या हक्काचे अन्न काळाबाजार करत बाहेर विकतात यावर कठोर निर्बंध येण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT