Nagpur crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Crime News: उपचाराच्या नावाखाली ५० तरूणींवर लैंगिक अत्याचार, मानसोपचार तज्ज्ञावर चौथा गुन्हा दाखल

Nagpur crime news: मानसोपचार तज्ज्ञावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

Bhagyashree Kamble

नागपूरात एका मानसोपचार तज्ज्ञाने अल्पवयीन मुली आणि तरूणींचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडालीय. या प्रकरणात मानसोपचारतज्ज्ञावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची विधानपरिषदेच्या उपसभापति डॉ. निलम गोऱ्हे यांनी दखल घेतलीय. आरोपीवर कठोर कारवाई करत, त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील समुपदेशक विजय घायवट याने समुपदेशकाच्या नावाखाली तरूणींवर लैंगिक अत्याचार केला. आतापर्यंत ५० तरूणींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी एका पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ३ पीडितांचा शोध घेत गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणाची दखल घेत उपसभापतींनी नागपूर पोलीस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

संबंधित प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. मागील ९-१० वर्षांपासून आरोपीकडून पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू होते. सबळ पुरावे संकलित करण्यात यावे. तसेच लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात भर द्यावा, असंही डॉ. निलम गोऱ्हे म्हणाले. मुख्य म्हणजे या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच साक्षीदार सुरक्षा कायदा अंतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याबाबत पोलिसांनी पावले उचलावीत. त्यांच्या नावाची गोपनीयता राखण्यात यावी. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची नियुक्ती करा, अश्या पद्धतीचे निर्देश उपसभापति डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Pakistan Airstrike: पाकिस्तानकडून मध्यरात्री अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक, ३७ जणांचा मृत्यू

Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन; कुठून कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप?

Gadchiroli news: गडचिरोलीत रक्तरंजित थरार, नवऱ्याकडून बायकोवर चाकूने सपासप वार

SCROLL FOR NEXT