Nagpur Police Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Suspend News: रेस्टॉरंट मालकाचा महिलेशी वाद, पोलिसांकडून वरिष्ठांशी न विचारताच तपास; अखेर दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित

Nagpur Police Officers Suspended: महिलेशी वाद घातल्याच्या गुन्ह्याखाली रेस्टॉरंट मालकाला पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर पोलिसांनी मारहाण करत ५ लाख रूपये मागितले.

Bhagyashree Kamble

महिलेशी वाद घातल्याच्या गुन्ह्याखाली रेस्टॉरंट मालकाला पोलीस ठाण्यात नेलं, त्यानंतर पोलिसांनी मारहाण करत ५ लाख रूपये मागितल्याच्या आरोपावरून नागपुरातील दोन पोलीस हवालदार निलंबित करण्यात आलेआहे. समाधान कांबळे आणि प्रवीण वाकोडे असं निलंबित पोलिसांचे नाव असून, दाखल गुन्ह्यात वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता तपास केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यश दुबे नावाच्या व्यक्तीच्या कॅफेमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री दुसऱ्या रेस्टॉरंटचे संचालक सायरस चेंग हे गेले होते. त्या ठिकाणी सायरस चेंग यांचा एका महिलेसोबत वाद झाला होता. वादानंतर महिलेनं चेंग यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून चेंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, पण पोलीस हवालदार यांनी विना तपास सुरू केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार प्रवीण वाकोडे यांनी वरिष्ठांशी परवानगी घेतली नाही. परस्पर प्रकरणातील केस डायरी घेत विना परवानगी तपासाला सुरूवात केली. एवढंच नाही तर, सायरस चेंग यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण करीत प्रकरण सोडवण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.

शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनमधील समाधान कांबळे आणि प्रवीण वाकोडे असं आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नावं असून, या दोघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस विभाग यात सायरस चेंग यांनी केलेले आरोपाची चौकशी करत असून, पोलीस हवालदार यांना निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती

Maharashtra Rain : २ दिवस राज्यात या भागात मुसळधार पावसाचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT