Nagpur police crackdown; 411 kg of drugs worth Rs 2 crore destroyed
Nagpur police crackdown; 411 kg of drugs worth Rs 2 crore destroyed मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; पावणे दोन कोटींचे ४११ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

मंगेश मोहिते

नागपूर: नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ५७ गुन्ह्यांत पकडले गेलेले ४११ किलो अंमली पदार्थ नागपूर (Nagpur) पोलीसांनी नष्ट केले आहेत. यात गांजा, मोफेडील ड्रग्स (Drugs) अशाप्रकारचे अनेक अंमली पदार्थ होते. ज्याची बाजारात किंमत १ कोटी ७५ लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नष्ट या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली आहे. (Nagpur police crackdown; 411 kg of drugs worth Rs 2 crore destroyed)

हे देखील पाहा -

अंमली पदार्थाविरोधात नागपुरात मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. या कारवायांमध्ये गांजा, मोफेडीलसारख्या ड्रग्सचा सुद्धा समावेश आहे. हे सगळे ड्रग पकडल्यानंतर यातील काही सॅम्पललिंगसाठी पाठविण्यात येत असते. मात्र सगळा मुद्देमाल मालखाण्यात जमा केला जातो. मात्र हा साठा जास्त दिवस ठेवणे कठीण असते त्यामुळे त्याला नष्ट करावे लागते. यासाठी पोलिसांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीत अनेक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनत हा माल नष्ट करण्यात येतो.

मागील काही काळात पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या. त्यातील ५७ गुन्ह्यात पकडण्यात आलेला माल नष्ट करण्यात आला. ४११ किलो वजनाच्या गांजासह वेगवेगळे ड्रग्स यात होते. याची बाजारात किंमत १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्या प्रमाणात हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आणि कारवाया करण्यात आल्या यावरून दिसून येते की गांजा असो की ड्रग्स याची नागपूरात किती मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळे आता यावर वेळीच लगाम घालण्याची खरी गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT