Nagpur Crime
Nagpur Crime Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Crime: आधी रेकी, मग मारायचे डल्ला... मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ८२ बॅटऱ्या जप्त

संजय डाफ

Nagpur Crime News: जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या टोळीकडून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर (Nagpur) ग्रामीण पोलिसांनी जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या टोळीकडून चोरीच्या 82 बॅटरीज जप्त करण्यात आल्या असून त्याची किंमत 26 लाख एवढी आहे. या टोळीमधील पाच सदस्यांना अटक करण्यात आली असून यातील एक दिल्लीचा आहे. आधी ज्या ठिकाणी जिओ मोबाईल टावर लागले आहे त्या ठिकाणी जावून रेकी करायची आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्या टॉवर मधील बॅटरीची चोरी करायचे.. असा या टोळीचा प्लॅन होता.

प्रत्येक जिओ टावरला (JIO) या बॅटरी लागलेल्या असतात आणि या एका बॅटरीची किंमत जवळपास 80 ते 90 हजाराच्या घरात आहे. अशा एकूण 82 बॅटरी या टोळीने चोरल्याचं उघड झालं असून त्याची किंमत 26 ते 27 लाखाच्या घरात आहे. या टोळीने नागपूर ग्रामीण भागात अक्षरशा हैदोस माजविला होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपकडून मला संपवण्याचा प्रयत्न, त्यांना केवळ मीच दिसतोय; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray: आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झाला आहात का? संजय राऊतांचा सवाल; उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

IMD Rain Alert: मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Rashi Bhavishya : पैशांची आवक वाढेल, पुढे जाण्याचे मार्ग मिळतील; तुमच्या नशीबात आज काय लिहलंय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT