Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: वाळू तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; पाय मोडला, नागपुरातील धक्कादायक घटना

Nagpur Latest News: वाळू तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; पाय मोडला, नागपुरातील धक्कादायक घटना

Satish Kengar

Nagpur Latest News: विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्यावर ट्रॅक्टर चालवून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना पवनी तालुक्यातील मौजा खातखेडा वाळू घाटावर घडली आहे. यातील आरोपींची नावे आशिष काटेखाये (35), पंकज काटेखाये (33) आणि एक अनोळखी व्यक्ती असे एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवनी तालुक्यातील खातखेडा येथील नदी घाटावरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे यानंतर नायब तहसीलदार मयूर चौधरी तलाठी बहुरे व किरण मोरे घटनास्थळी दाखल झाले.

याचदरम्यान, नदी घाटातून विना नंबरचा ट्रॅक्टर बाहेर येताना दिसताच चालकाला थांबवून टॉर्चच्या साह्याने झाडाझडती घेण्यात आली. यावेळी ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू दिसल्याने रॉयल्टी संदर्भात विचारणा करण्यात आली. सदर रेतीची रायल्टी नसल्याचे चालकाने सांगितल्याने ट्रॅक्टरच्या जप्तीची कारवाई करण्यास महसूल कर्मचारी सज्ज होताच चालकाने मालकाला दूरध्वनीद्वारे कळविले.  (Latest Marathi News)

दुचाकीने मालक व एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी दाखल होऊन 'तुम्ही माझा ट्रॅक्टर वारंवार कसा लावता? तुमचा बंदोबस्त लावतो', असे म्हणून चालक आशिष काटेखाये, मालक पंकज काटेखाये व एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून घटनास्थळी असलेल्या तलाठी किरण मोरे यांचे अंगावर भरधाव वेगाने वाळूचा ट्रॅक्टर चालविला.

यात तलाठी मोरे यांच्या उजव्या पायाचे हाड मोडून गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या भरारी पथकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तलाठी मोरे यांना उपचारासाठी तात्काळ पवनी येथील गभने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर आलेल्या अहवालावरून पायाचे हाड मोडल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणाची पवनी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विरूद्ध भादंवी कलम 307, 353, 333, 379, 506, 109 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, 48(7), 48(8) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT