Tiger Attack Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : पती- पत्नी शेतात काम करत असताना भयानक घडले; पत्नीदेखत वाघाने ओढत नेले, शेतकऱ्याचा मृत्यू

Nagpur News : काही दिवसांपासून चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात वाघाने हल्ले केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर नागपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाच्या हल्ल्याची घटना

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मागील काही दिवसांमध्ये वाघाकडून हल्ले केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जंगल परिसरातून पाणी व अन्नाच्या शोधात शेत शिवारात येत हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ले करण्यात येत आहेत. यातच शेतात पती- पत्नी काम करत असताना पाठीमागून येत वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पारशिवनी तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

नागपूरच्या पारशिवनी तालुक्याचा वनविभागाच्या सिमेतील नेऊरवाडा परिसरात शनिवारी सदरची घटना घडली आहे. या घटनेत नेऊरवाडा येथील रवी कवडु कालसर्पे (वय ३८) असं मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात वाघाने हल्ले केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर नागपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

पाठीमागून येत केला हल्ला 
दरम्यान रवी कालसर्पे आणि त्याची पत्नी दोघेही शनिवारी सकाळी शेतात कामासाठी गेले होते. कामाला सुरवात केल्यानंतर काही वेळातच अचानक रवीच्या मागून वाघाने येत हल्ला केला. जवळच असलेल्या रवीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने रवीवर हल्ला करत जीवे ठार केले. यामुळे रवीची पत्नीने घाबरून जोरजोरात आरोड्या मारण्यास सुरवात केली. यामुळे वाघ तेथून पळून गेला. तर घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले होते. 

तर पारशिवनी पोलीसाना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या हल्ल्यात शेतकर्यांचा मृत्यू होऊनही वन विभागाचे अधिकरी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. यामुळे वन विभागाच्या पंचनामा न होताच लोकांच्या संतप्त भावनांमुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना मनधरणी केली. दरम्यान दोन महिन्यांपासून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी वाघाला पकडण्याचा सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT