Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: वीस लाखांचा अन्न पदार्थाचा साठा जप्‍त; भेसळ असल्‍याचा संशय

वीस लाखांचा अन्न पदार्थाचा साठा जप्‍त; भेसळ असल्‍याचा संशय

मंगेश मोहिते

नागपूर : दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवत (Nagpur) नागपूरमध्ये वीस लाखांचा अन्न पदार्थाचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त केला. (Live Marathi News)

दिवाळी (Diwali) सारख्या सणासुदीच्या काळात अन्न पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. मात्र त्याचा फायदा काही व्यापारी घेतात आणि भेसळयुक्त माल बाजारात आणतात. यावर लक्ष करत अन्न व औषध विभागाने विशेष मोहीम राबवून नागपुरात 16 ठिकाणी धाड टाकल्या. यामध्ये 10 हजार 883 किलो वजनाच्या अन्न पदार्थाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला आहे. ज्याची किंमत 20 लाख 19 हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे.

नमुने तपासणीसाठी

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून आता अन्न व औषधी प्रशासन विभाग रिपोर्टची वाट पाहत आहे. सणासुदीच्या काळात पैशाच्या लालचे पोटी अनेक जण असे पावलं उचलतात. मात्र त्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागतो. त्यामुळे आता अन्न प्रशासन विभाग या सगळ्या बाबी वर कडक नजर ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी लोक कुणाची भाकर खातायेत?' निशिकांत दुबे मराठीविरोधात बरळले| पाहा VIDEO

Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Manikgad Fort Tourism : नयनरम्य निसर्ग अन्...; पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय ऐतिहासिक किल्ला, एकदा पाहाच...

SCROLL FOR NEXT