नंदुरबार : नंदूरबार जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जि.प. सभापदी (Nandurbar) पदाची निवड रंगतदार होणार असून सत्ताधारी व विरोधकांनी प्रत्येकी पाच अर्ज खरेदी केले आहेत. (Letest Marathi News)
नंदुरबार जिल्हा परिषदेत (Nandurbar ZP) नाट्यमयरित्या घडामोडी घडून (BJP) भाजपच्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित या अध्यक्षपदी विजयी झाल्या. तर काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक हे भाजप व त्यांच्या समर्थकांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापुर्वी स्थापन झालेली महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापदीपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी (Congress) काँग्रेसकडून समाज कल्याण सभापती पदासाठी काँग्रसचे रतन खात्र्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी हिराबाई रविंद्र पाडवी, विषय सभापती पदासाठी काँग्रेसचे अजित सुरूपसिंग नाईक, निर्मला सीताराम राऊत, देवमन पवार यांचे अर्ज खरेदी करण्यात आले.
भाजप व समर्थकांतर्फे समाज कल्याण सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे शंकर आमश्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी संगीता भरत गावीत, विषय सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे गणेश रुपसिंग पराडके, भाजपाच्या ऐश्वर्यादेवी जयपालसिंग रावल, जयश्री दीपक पाटील यांचे अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत चार सभापतींची निवड असून सत्ताधारी व विरोधकांनी प्रत्येकी पाच अर्ज खरेदी केले आहेत. त्यामुळे सभापतींची निवडीसाठी मतदान होईल हे नक्की झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.