Nagpur Bhandara Highway Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : भरधाव वाहन मेंढ्यांच्‍या कळपात शिरले; १०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्‍यू

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदाजवळ मौदा टी पॉईंटवर आज पहाटे एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्या (Nagpur) आहेत. या घटनेनंतर मेंढ्यांना चिडणारा वाहन घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेमुळे धनगर कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

उन्हाळ्याच्‍या दिवसात शेत मोकळे असल्‍याने रानावनात फिरत मेंढ्यांना चारले जात असते. याकरीता नागपूर जिल्ह्यात गुजरात व राज्यस्थानमधून मोठ्या प्रमानावर मेंढ्याचे कळप चराईसाठी येत असतात. परंतु, आता पाऊस होत असल्‍याने शेतांमध्‍ये देखील पिकांची लागवड झाली आहे. यामुळे आता मेंढ्यांचे कळप मोकळ्या जागेवर किंवा परतीच्‍या मार्गाला जात आहेत. अशा प्रकारे कळप जात असताना भरधाव अज्ञात वाहन मेंढ्यांच्‍या कळपात शिरून चिरडत सुसाट वेगाने गेला.

१०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्‍यू

सध्‍या शेतात पिकांची पेरणी होत असल्याने हे कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नागपूर– भंडारा मार्गावरून परत जात असताना मौदा टी पॉईंटवर अज्ञात वाहनाने मेंढ्यांना चिरडले. यात १०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्‍यू झाला आहे. यामुळे सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत महामार्गावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरलेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT