Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Snake in Scooter: स्‍कुटरच्‍या हेडलाईटमधून निघाला साप; महिला थोडक्‍यात बचावली, व्हिडिओ झाला व्‍हायरल

Snake In Honda Activa Scooter: स्‍कुटरच्‍या हेडलाईटमध्‍ये साप; नागपूरातील प्रकार, व्हिडिओ झाला व्‍हायरल

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : पावसाळ्याच्‍या दिवसात साप, विंचू निघत असतात. ते कुठेही कानाकोपऱ्यात जावून बसतात. असाच प्रकार (Nagpur) नागपूरात समोर आला आहे. महिलेच्या स्कूटरच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना घडली आहे. स्कूटरच्या हेडलाईट मधून (Snake) साप काढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल झाला आहे. (Live Marathi News)

नागपूरातील सीमा ढूलसे नावाची महिला बँक योजनेच्या कलेक्शनचे काम करतात. मंगळवारी (११ जुलै) त्या नागपूरच्या वाठोडा परिसरातील एका इमारतीमध्ये कलेक्शनसाठी गेल्या होत्या. इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची स्कूटर पार्क केली होती. काम आटोपून परत आल्यावर स्कूटर काढताना हेडलाईट मधल्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपटी दिसली. त्यांनी लगेच स्कूटर थांबवून सर्पमित्रांना फोन केला.

बिनविषारी होता साप

सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन हेडलाईटमधून साप बाहेर काढला. हा साप बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. मात्र गाडी काढतानाच साप असल्याचे लक्षात आल्याने बरे झाले; अन्‍यथा चालत्या गाडीत जर साप बाहेर आला असता तर अपघात होण्याची शक्यता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

SCROLL FOR NEXT