Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: चालकाला डुलकी लागली, अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

साम टिव्ही ब्युरो

>> मनोज जयस्वाल

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र थांबायचं नाव नाही घेत आहे. येथे पुन्हा एकदा एक भीषण अपघात घडला आहे. महामार्गावर वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतं आहे. वाशिमच्या कारंजा ते शेलुबाजार दरम्यान समृद्धीवर लोकेशन १८७ वर कार चालकाला डूलकी आल्याने कार पलटी होऊन १ मुलगी जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून नागपूरला कारने जात असताना कारंजा समृद्धीवरील टोल नाक्याच्या अलीकडे मुंबई कॉरिडॉर लोकेशन १८७ वर कार चालकाला डूलकी लागली. कार वेगात असलेल्या कारने पलटी घेत दुसऱ्या लेनवर गेली. या अपघातात १३ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

चालकासह इतरांना कोणतीही इजा पोहोचली नाही. अपघाताची माहिती मिळताच १०८ समृद्धी लोकेशन पायलट विधाता चव्हाण व डॉ.शेख यांनी जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात

दरम्यान, शनिवारी (३ जून) रात्रीही समृद्धी महामार्गावर अपघातात आणखी एक अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करताना बुलढाण्याजवळील मेहकरजवळ लघुशंकेसाठी तीन प्रवाशी थांबले होते. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय मंटे (रा. दिग्रस) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

SCROLL FOR NEXT