Raj Thackeray On Worli Assembly Election:  Saamtv
महाराष्ट्र

Raj Thackeray: 'आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार', राज ठाकरेंची मोठी घोषणा; वरळीत 'हायहोल्टेज लढत' होणार?

Raj Thackeray On Worli Assembly Election: विधानसभेच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाचा दौरा करत आहे. कालपासून राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये तळ ठोकला असून ते जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २४ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी, महायुतीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वतः राज ठाकरे मैदानात उतरुन महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज नागपूर दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली असून वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे.

काय म्हणालेत राज ठाकरे?

विधानसभेच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाचा दौरा करत आहे. कालपासून राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये तळ ठोकला असून ते जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. आज नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे.

वरळीत उमेदवार देणार!

"मी निवडणूक लढवणार आहे. मागच्यावेळी आम्ही गोष्ट केली, त्या मतदारसंघात आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. एकदा ही गोष्ट केली, वारंवार कशी होईल, असे म्हणत आदित्य ठाकरेंविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही मनसेकडून उमेदवार देणार," अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी मारली.

लाडकी बहीणवरुन मोठे विधान!

लोकांना कामालां लावा, लोक कामे मागत आहेत, फुकट पैसे मागत नाही. शेतकरी फुकट वीज मागत नाही, मत पाहिजे म्हणून फ्री देतात. लोकांचे टॅक्सचे पैसे वाटत आहेत, असे कसे करून चालणार? मध्यप्रदेशमध्ये फक्त लाडकी बहीणच्या यशामुळे मत मिळाली नाहीत, इतरही कारणे असतील. लाडकी बहीण योजनेचा पहिला जाईल, दुसरा महिना कदाचित जाईल. त्यानंतर सरकारकडे कुठे पैसे आहेत? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT