Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: पोलिसांनी तपासले १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज; घरफोडी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश

पोलिसांनी तपासले १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज; घरफोडी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश

मंगेश मोहिते

नागपूर : मध्यप्रदेशमधून येऊन नागपुरात घरफोडी करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. यासाठी गुन्हे शाखा (Police) पोलिसांनी जवळपास 120 सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याच फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. यानंतर मध्यप्रदेशच्या ग्वालेरमधून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एका कारसह सोन्या– चांदीचे दागिने आणि कॅश हस्तगत करण्यात आली. (Breaking Marathi News)

मध्यप्रदेशच्या इंदोरमधील एक गॅंग नागपुरात (Nagpur News) येऊन आधी एक बाईक चोरतात आणि त्याच बाईकचा सहारा घेत खाली घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी त्या घरात चोरी करतात. अशीच एक घटना तहसील पोलीस स्टेशन हद्दीत घडली आणि पोलिसांसह गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू केला. मात्र आरोपी हाती लागत नसल्याने गुन्हे शाखा पोलिसांनी जवळपास 120 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच फुटेज तपासले. त्या फुटेजच्या आधारावरून आरोपी निश्चित करण्यात आले.

एक आरोपी फरार

आरोपींची तांत्रिक पद्धतीने माहिती काढली असता मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेर भागात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आपले पथक पाठवत ग्वाल्हेरवरून दोन आरोपींना अटक केली. तर एक मात्र फरार झाला. हे तीनही आरोपी मध्यप्रदेशच्या इंदोरमधील राहणारे असून ते अशा प्रकारे वेगवेगळ्या शहरात जाऊन आधी बाईक चोरतात आणि मग त्या बाईकवर फिरत घरफोड्या करत असल्याचा तपासात पुढे आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

Maharashtra Live News Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंधेरी स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड

Famous Actress Death : हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड; झोपेतच झाला मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Garlic Chutney Recipe : झणझणीत लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव

DCM Ajit Pawar : 'तिकीट देताना जातीपाती...'; आगामी निवडणुकांवर अजित पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT