Nagpur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : धक्कादायक! सुनेने सुपारी देऊन सासूला संपवलं, अंत्यविधीही उरकला; पोलिसांनी असा लावला हत्येचा छडा

Nagpur Crime News : पतीच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सासूची चक्क सुनेने सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली.

Satish Daud

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

पतीच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सासूची चक्क सुनेने सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिलेसह तिच्या दोन चुलत भावांना अटक केली. सुनीता राऊत (वय 54) असे मृत महिलेचे नाव आहे. तर वैशाली राऊत (वय 32) असं आरोपी सुनेचे नाव आहे. तिच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनीता राऊत या सून वैशाली आणि 5 वर्षाच्या नातीसोबत नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होत्या. 28 ऑगस्ट रोजी सुनीता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असा बनाव आरोपी वैशालीने रचला.

त्याच दिवशी तडकाफडकी तिने सासूवर अंत्यसंस्कार देखील केले. मात्र, सासू आणि सुनेत वाद झाला आणि या वादातूनच (Crime) काहीतरी विपरीत घडले, अशी कुजबूज शेजाऱ्यांमध्ये सुरू होती. काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संपूर्ण हत्याकांडाचा छडा लावला.

दरम्यान, आमच्या घरी रात्री दोन मामा आले होते. त्यांनी माझ्या आजीचा गळा दाबला, अशी माहिती आरोपी वैशाली हिच्या 5 वर्षीय मुलीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, आपणच सुनीता यांची हत्या केली अशी कबुली त्यांनी दिली. मृत सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होता.

तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल, या विचारातून वैशालीने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वैशाली तसेच तिचा भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल अटक केली आहे. वैशालीचे दोन्ही चुलत भाऊ मध्यप्रदेशातील पांढुरणा जवळील पांढरा गोडी येथील राहणारे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT