Nitin Gadkari Saam tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari News: पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari Latest News: पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

साम टिव्ही ब्युरो

Nitin Gadkari Latest News: दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. (Latest Marathi News)

हा उपक्रम करण कोठारी ज्वेलर्स, नागपूर यांच्या विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी उपक्रमाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. नागपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने आपल्या घरात संत्र्याचे झाड लावावे या आवानालाही अनेकांनी प्रतिसाद दिला होता.

वडवृक्ष लावणीच्या या अभियानात सहभागी व्हावे, निसर्गाच्या हिरवेपण जपण्याची जबाबदारी, आपणा सर्वांची आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीच्या अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार! डोनाल्ड यांच्या विजयाने भारतावर काय परिणाम होणार?

IND vs AUS: ना रोहित, ना विराट; BGT मध्ये हा भारतीय फलंदाज धावांचा पाऊस पाडणार, Ricky Ponting ची भविष्यवाणी

How to Wake Up Earlier: आयुष्यात यश हवं तर लवकर उठा; जाणून घ्या पहाटे ५ वाजता उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

SCROLL FOR NEXT