Pune Breaking News: राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांचं निलंबन, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

Shailaja Darade News: राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांचं निलंबन, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Shailaja Darade News
Shailaja Darade NewsSaam Tv
Published On

>> अक्षय बडवे

Shailaja Darade News: राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून पैसे घेत नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाच्या वतीने निलंबनाची कारवाई केली आहे.

Shailaja Darade News
Who is Ravi Ruia: भारतातील माणसाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, किंमत जाणून व्हाल थक्क; कोण आहे 'ही' व्यक्ती? जाणून घ्या...

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. हडपसर पोलिसांनी शैलजा रामचंद्र दराडे आणि दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकार 15 जून 2019 पासून सुरु होते.  (Maharashtra News)

Shailaja Darade News
Radhakrishna Vikhe on AJit Pawar : अजितदादांच्या येण्याने सरकारच्या निर्णय क्षमतेला गती आली : राधाकृष्ण विखे पाटील

डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या कडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या. याप्रकरणी अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com