Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरच्या कन्हान नदीत ४ जण बुडाले, NDRF कडून शोध सुरु

4 People Drowned In Kanhan River: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी येथे ही घटना घडली आहे.

Priya More

संजय डाफ, नागपूर

Nagpur Kanhan River: नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही तरुणांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान नदी (Kanhan River) परिसरामध्ये फिरण्यासाठी काही तरुण आपल्या मैत्रिणींसोबत गेले होते. त्याच वेळी हे सर्वजण नदीमध्ये पाोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन तरुण आणि एक तरुणी नदीमध्ये बुडाले. तर सुदैवाने दोन तरुणी बचावल्या आहेत.

विजय ठाकरे, सानिया म्हरसकोल्हे, अंकुश बघेल आणि अर्पित अशी नदीमध्ये बुडालेल्यांची नावं आहेत. या चारही जणांचा शोध सुरु आहे. या चारही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एनडीआरएफकडून त्यांचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोठी घटना! वसईत मालगाडीचे मागील डबे वेगळे झाले; फ्रेट कॉरिडॉरवरील वाहतुकीत खळबळ

Beauty Care Tips : चुकीचा फेसवॉश वापरताय! जाणून घ्या तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश आहे योग्य

Chia Seeds Benefits: चिया सीड्सचे पाणी पिऊन कंटाळा आलाय? ट्राय करा खाण्याचे ७ चविष्ट अन् हेल्दी पर्याय

Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

SCROLL FOR NEXT