Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: भाविकांप्रमाणे पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड हवा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

भाविकांप्रमाणे पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड हवा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

संजय डाफ

नागपूर : मंदिर महासंघाच्या आवाहनावर नागपुरातील पाच मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली. मंदिरातील पवित्र कायम (Nagpur News) राहावे, यासाठी भक्तांनी मंदिरात प्रवेश करताना चित्रविचित्र किंवा अश्लील कपडे घालू नये, असे मंदिर महासंघाचं म्हणणं आहे. मात्र, भक्तांप्रमाणेच पुजाऱ्यांनाही वस्त्र संहिता लागू करावी; अशी मागणी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी केलीय. (Breaking Marathi News)

मंदिर महासंघाने आवाहन केल्यावर नागपूरातील पाच मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आलीय. त्यानंतर आता पुजाऱ्यांनाही ड्रेस कोडची मागणी पुढं आलीय. भाविकांना वस्त्र संहिता लागू केली, यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, अनेक मंदिरात पुजारी खाली धोतर आणि वर केवळ दुपट्टा किंवा काहीही घातलेले नसते. त्यामुळे भाविकांनी जर नीट कपडे घालावे असे वाटत असेल तर तोच नियम पुजाऱ्यांनाही लागू होतो.

पुजाऱ्यांनी मागणीचे स्वागत

शेगावच्या संत गजानन मंदिरात पुजारी आणि सेवक पैजामा, शर्ट आणि डोक्यावर टोपी या एकाच पोशाखात असतात. त्याच धर्तीवर (Shegaon) इतर मंदिरातही तशा किंवा इतर पारंपरिक पोशाखात पुजारी असावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सावरबांधे यांनी केली आहे. दुसरीकडे पुजाऱ्यांनी या मागणीचे स्वागत केले आहे. सर्व पुजाऱ्यांनी एकच वस्त्र संहिता असेल तर यात काहीच हरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT