पराग ढोबळे
नागपूर : ऑनलाईन गेम खेळण्याचा प्रचंड नाद लागल्याने हा गेम अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली असून रात्री रूममध्ये गेल्यानंतर युवतीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून गेम टास्कमुळे मुलीने गळा चिरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
नागपुरातील धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आरबीआयमध्ये उच्च पदावर नोकरीला असल्याची माहिती आहे. तर मुलगी शिक्षण घेत ती मागील काही दिवसांपासून युरोपियन संस्कृतीवर लिखाण करत होती. दरम्यान तिला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागल्याने ती तासनतास गेम खेळण्यात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उठवायला गेलेल्या आईला बसला धक्का
दरम्यान रात्री उशिरापर्यंत सोबत असल्यानंतर सदर मुलगी हि तिच्या रूममध्ये गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी मुलगी उठली नाही; म्हणून तिची आई तिला उठविण्यासाठी गेली. यावेळी आई वडील उठल्यावर त्यांना रक्ताचा थारोळ्यात मुलगी दिसून आली. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबियांना जबर धक्का बसला. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिट्ठी
दरम्यान आत्महत्या करण्यामागे नेमकं काय घडलं हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र ती सतत ऑनलाइन गेम खेळत होती. तसेच 'Death' या शब्दला गुगलवर सर्च करत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आत्महत्या करण्यासाठी मुलीने ऑनलाइन चाकू मागवला असल्याचं बोललं जातं आहे. तर तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवल्याच बोलल जात आहे. या प्रकरणी पुढील तपास धंतोली पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.