Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : एकाला वाचवायला गेला अन् दुसराही बुडाला; मन हेलावून टाकणारी घटना

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर (Nagpur) शहरातील वाकी परिसरात घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर (Nagpur) शहरातील वाकी परिसरात घडली आहे. कुणाल लोहकरे आणि नितेश साहू अशी मयत तरुणांची नावे आहेत. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur News Today)

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीचे पाणी खोलवर असल्याने दोघांचेही मृतदेह दिसून आले नाहीत. आज म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा शोधमोहिम राबवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नेमकं काय घडलं?

शहरातील जरीपटका परिसरातून आठ तरुण वाकीला कन्हान नदीच्या काठावर पिकनिकसाठी गेले होते. त्यापैकी 28 वर्षीय कुणाल लोहकरे नामक तरुण पोहण्यासाठी नदीत उतरला. मात्र काही नदीच्या पाण्यात तो बुडू लागला. मित्र नितेश साहूला दिसताच कुणाल ला वाचवण्यासाठी नदीत उतरला, मात्र या घटनेत दोघही बुडाले.

रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, खापा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नदीच्या पाण्यात मृतदेह शोधण्याचे प्रयत्न केले. पण मृतदेह खोलवर पाण्यात बुडल्याने शव मिळून आले नाही.

सकाळी पुन्हा शोध मोहीम केली जाईल, अशी माहिती खापा पोलीस स्टेशचे निरीक्षक अजय मानकर यांनी दिली आहे. दोन जीवलग मित्रांचा अचानक नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खिळे नव्हे, ग्राउटिंग इन्जेक्शनचे नोजल बसवले

Multibagger Defence Stock: ६ महिन्यात पैसे दुप्पट; बाजारातील हटके स्टॉक, 5 वर्षांत लाखाचे झाले २४,२३,००० रुपये!

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Donald Trump : भारतावर 100% टॅरिफ लावा... मोदींना मित्र म्हणवणाऱ्या ट्रम्पने पाठीत खंजीर खुपसला

Crime: आई गावाकडे गेली, बापाने घेतला संधीचा फायदा; पोटच्या मुलीवर बलात्कार, डोकेदुखीमुळे रुग्णालयात गेली अन्...

SCROLL FOR NEXT