Tiger Attack Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Nagpur News : घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी जंगलात शोध घेतला. यावेळी मधुकर राऊत हे शेतकऱ्यांचा एक पाय गायब असलेल्या छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : मागील काही दिवसात वाघाने हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. यातच गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पारशिवानी तालुक्यात घडली आहे. मागील आठवड्याभरातील दुसरी घटना शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे वाघांचे वाढलेले हल्ले रोखण्यासाठी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरात वाघाच्या शेतकऱ्यांवर हल्ले वाढले आहेत. काल झालेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी मधुकर राउत (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चारा आणण्यासाठी गेलेल्या असताना मधुकर राऊत यांच्यावर हल्ला केला. वाघाने हल्ला करत त्यांना ओढत नेत एक ते दीड किलोमीटर घनदाट जंगलात नेऊन भक्ष्य केले. त्यांचे अवयव वेगवेगळे करून टाकले होते. 

कुटुंबीयांना आढळला छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह  

गुरांना चारा आणण्यासाठी गेलेले मधुकर राऊत हे घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी जंगलात शोध घेतला. यावेळी मधुकर राऊत हे शेतकऱ्यांचा एक पाय गायब असलेल्या छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला. दरम्यान घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

पाच महिन्यात सहा जणांचा मृत्यू 

दरम्यान ५ महिन्यात वाघाचा हल्ल्यात त्या भागात सहा लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर दोन दिवसांपूर्वी तरुण शेतकऱ्यांचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला. सततच्या वाघाच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा, वारंवार किती लोकांचा जीव गेल्यावर यावर वाघाचा बंदोबस्त करणार का असा सवाल भयभीत गावकरी विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

Police Death : नवी मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नीशी वादानंतर घरात आयुष्य संपवलं

Potato Recipe : बटाट्याला द्या चटपटीत ट्विस्ट, फक्त १० मिनिटांत बनवा 'ही' प्रसिद्ध चाट रेसिपी

SCROLL FOR NEXT