Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Nagpur News : शेत शिवारात शेळ्यांसाठी चारा आणायला गेले. पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेता सभोवताल तारांच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. रात्री सोडलेला करंट शेतमालक बंद करायला विसरला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : शेतात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान केले जात असते. हे नुकसान टाळण्यासाठी शेताच्या बांधावर तर बांधून तारेत विद्युत प्रवाह सोडण्यात आलेला होता. मात्र शेळ्यांसाठी चारा कापत असताना या विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याला विजेचा जोरदार झटका बसला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली शेतशिवारात घडली आहे. 

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली शेतशिवारात घडलेल्या घटनेत शेषराव सुखदेव मारबते (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. शेषराव मारबते हा कुंडलिक श्रावण तेलोते यांच्या शेत शिवारात शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. यात पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेता सभोवताल तारांच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. रात्री सोडलेला करंट शेतमालक बंद करायला विसरला. 

चारा कापताना झाला घात  

दरम्यान पिकांचा संरक्षणासाठी सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का शेषराव मारबते हे शेतात चारा आण्यासाठी गेले होते. तारेत विद्युत प्रवाह असल्याने त्याला शेषराव यांचा स्पर्श झाला. यामुळे जोरदार विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नागरिकांना समजताच धाव घेत शेषराव यास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

शेत मालकाविरोधात गुन्हा दाखल 

शेतकऱ्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग केला होता. मात्र निष्काळजीपणामुळे एकाचा बळी गेला आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शेत शिवारात जाऊन पंचनामा केला. यात गुन्हा शेत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Building Collapsed : मुंब्र्यात मध्यरात्री दुर्घटना, २५ वर्ष इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

GST Reforms: प्रत्येक घराघरात वापरणाऱ्या १५ वस्तू, १० दिवसांत होणार स्वस्त, सगळी यादी एका क्लिकवर

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

SCROLL FOR NEXT