Shambhuraj Desai Saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai: सुषमा अंधारेंना काविळ झाला असावा; शंभूराजे देसाई यांची टीका

सुषमा अंधारेंना काविळ झाला असावा; शंभूराजे देसाई यांची टीका

मंगेश मोहिते

नागपूर : चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे शिंदे गटाच्‍या आमदारांबाबतीत कुठलाही ठोस पुरावा नसताना आरोप करत आहे हे चुकीचे आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शहाजी बापूने कष्टातून जमिन विकत घेतली. घर बांधले असेल तर ते त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. सुषमा अंधारेंना कावीळ झाला असावा; अशी टीका (Shambhuraj Desai) शंभूराजे देसाई यांनी केली. कावीळ झाल्यावर जस सगळं पिवळ दिसतंतशी अवस्था त्यांची झाली आहे. (Live Marathi News)

शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुषमा अंधारे सेनेत येण्यापूर्वी काय बोलल्या होत्या, याची आठवण करून द्यावी. सभागृहात (Nagpur) नागपूर मध्ये एनआयटीच्या उच्च न्यायालयाचा आलेला निकाल गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केला आहे. सुषमा अंधारे या सभागृहात नाही आणि त्यांना कधी सभागृहात येण्याची संधी मिळणार नाही असाही टोलाही देसाई यांनी लगावला.

किती कडक शब्दात बोलले हे वरच्या नेत्यांना दाखवण्यासाठी अंधारे बोलत असल्याची ही टीका शंभूराजे देसाई यांनी केली. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आहे. पूर्वी सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलले ते चालतं का? असा प्रतिप्रश्न केला

राऊतांनी हवेत तीन मारू नये

सुरज परमार प्रकरणात संजय राऊत यांनी हवेत तीर मारू नये. संजय राऊत यांच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. पत्राचाळ प्रकरणात तुम्ही फक्त जामिनावर सुटले आहेत. अनेक बाबी या प्रकरणात समोर येत आहे. त्यामुळे कुठलाही विषया संदर्भात काही माहिती असेल तर आमच्या यंत्रणेकडे द्यावी; आम्ही त्याची चौकशी करू असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला! आगीचे लोट, अंदाधुंद गोळीबार अन्..., ८ जण ठार, पाहा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update: ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का, शिंदे गटाची ताकद वाढली

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ नवी स्थानके लवकरच सुरू होणार; लोकलच्या फेऱ्याही वाढणार

Amravati : अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक; मतदार नोंदणीला सुरवात, राजकीय पक्षांची लगबग

Dussehra History: नवरात्रीनंतर दसरा का साजरा केला जातो?

SCROLL FOR NEXT