Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: व्यावसायिकाने कारमध्ये स्वतःला घेतले जाळून; पत्नी व मुलालाही पेटविण्याचा प्रयत्न

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे.

मंगेश मोहिते

नागपूर - खापरी पुनर्वसन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच (Car) जाळून घेतल्याची घटना पुढे आली आहे. बेलतरोडी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे. व्यावसायिकाने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यातून थोडक्यात बचावले. आगीत व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रामराज भट ६३, असे मृत व्यक्तीचे नाव. आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती देण्यात येत आहे.

आग लागल्यावर बऱ्याच वेळाने मदत

कारने पेट घेतल्यावर बऱ्याच वेळाने लोकांना कार दिसली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबद माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत भट यांचा मृत्यू झाला होता. पत्नी आणि मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे देखील पाहा -

रामराज यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम

रामराज यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. ते विविध कंपन्यांना नट-बोल्टचा पुरवठा करत होते. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने त्यांना प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट यांना आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. त्यांचा मुलगा नंदन हा इंजिनिअर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र मुलगा कामाला जायला तयार नव्हता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते आणि त्यामुळेच भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

वर्धा मार्गावरील हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगितले. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेले द्रवपदार्थ तिघांवरही फवारले आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले; परंतु आई व मुलगा जखमी झाले तर वडिलांचा मृत्यू झाला.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली एक सुसाईड नोट

भट यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट पाकिटात ठेवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पाकिट प्लास्टिक पिशवीत गुंडाळून कारपासून काही अंतरावर फेकून दिली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस देखील आगीचे कारण काय आहे याबाबत संभ्रमात पडले होते. काही अंतरावर पाकिट सापडल्याने आत्महत्येचे कारण समोर आले. सुसाईड नोट कन्नड आणि इंग्रजीमध्ये लिहिली होती. प्रचंड आर्थिक विवंचनेमुळे आपण हे पाऊल उचलत असून यासाठी कुणीही जबाबदार नसल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. भट यांनी बहिणींना संबोधित करताना बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती देखील या सुसाईड नोटमध्ये दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT