JP Nadda and Amit Shah Saam Tv
महाराष्ट्र

BJP Next President: लोकसभेनंतर भाजपमध्ये बदलाचे वारे! नवे अध्यक्ष नागपूरमधून ठरणार? 'या' नावांची होतेय चर्चा

New BJP President: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे नवे अध्यक्ष कोण असतील? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शातच भाजपचे नवे अध्यक्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ठरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gangappa Pujari

नागपुर, ता. ११ जून २०२४

लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून अखेरीस संपत असल्याने नवीन अध्यक्ष कोण असेल? याबाबत चर्चा सुरू झाल्यात. अशातच भाजपचे नवे अध्यक्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ठरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे नवे अध्यक्ष कोण असतील? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांना दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नवा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे निश्चित आहे. हे नवे अध्यक्ष आरएसएसच्या मुख्यालयातून ठरवले जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

भाजपच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओम माथुर व सुनील बन्सल यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.तसेच राज्यातून विनोद तावडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विनोद तावडे यांना पक्षात मोठी संधी मिळू शकते, असे महत्वाचे विधान केले होते. त्यामुळे विनोद तावडेंचेही नाव या शर्यतीत आघाडीवर आहे.

दरम्यान, भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून शिवराज सिंह चौव्हान, भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान ही नावे आघाडीवर होती. परंतु त्यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने आता नवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

AC Bus Fire : धावत्या एसी बसला अचानक आग, अग्नितांडवात २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण गंभीर

Panchank Yog 2025: दिवाळीपूर्वीच पंचक योग 3 राशींना करणार मालामाल; गुरु-शुक्र मिळवून देणार पैसाच पैसा

Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT