Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : मध्य नागपुर मतदारसंघात बांगलादेश परिसरात तणाव; काँग्रेस उमेदवाराकडून पैसे वाटपाचा भाजपचा आरोप

Nagpur News : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. सकाळपासून मतदान सुरु झाले असून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार सुरु आहेत

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत पैसे वाटप करण्याच्या कारणावरून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार मध्य नागपूर मतदारसंघातील बांगलादेश परिसरात समोर आला असून काँग्रेस उमेदवाराकडून पैशांचे पाकीट वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. सकाळपासून मतदान सुरु झाले असून अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार सुरु आहेत. तर एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचे आरोप देखील केले जात आहेत. असाच प्रकार आता मध्य नागपूर (Nagpur News) मतदारसंघात समोर आला असून भाजपकडून (Congress) काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचार कार्यालयात काही लोक लिफाफे घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त 
काँग्रेसचे उमेदवार शेळके यांच्या प्रचार कार्यालयात वाटप होत असलेले पैसे हे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा भाजपचा आरोप आहे. यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर या ठिकाणी निवडणूक विभागाचे अधिकाऱ्यांनी काही जणांना ताब्यात घेत सोबत नेले आहे.

काँग्रेसने फेटाळला आरोप 
पैसे वाटप करण्यात येत असलेल्या भाजपकडून करण्यात आलेला आरोप काँग्रेसने मात्र फेटाळला आहे. पण भाजपने निवडणूक विभागाच्या माध्यमातून कारवाई करायची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू, टिळक वर्माची फलंदाजीत गरूड झेप

Nagpur Breaking : नागपुरात मतदानानंतर मोठा राडा; EVM मशीन घेणाऱ्या जाणाऱ्या कारची तोडफोड

VIDEO : महाराष्ट्रात मविआचं सरकार? काय आहे Exit Poll ची आकडेवारी, पाहा Video

Maharashtra Exit Poll : मशाल की धनुष्यबाण, राज्यात कोणाचा आवाज घुमणार? एक्झिट पोलच्या आकड्यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Exit Poll : कोकण, उत्तर महाराष्ट्रानं महायुतीला दिली साथ, पण सत्ता कुणाकडे? विभागानुसार कुणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT