Bird flu Tiger Leopard Sakal
महाराष्ट्र

Nagpur News : बर्ड फ्ल्यूमुळे नागपूरच्या प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू

Bird flu : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर (गोरेवाडा) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालयामधील ३ वाघ आणि १ बिबट्या यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याची माहिती दिली. ते विधान परिषदेमध्ये बोलत होते.

Yash Shirke

Nagpur News : नागपूरच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विधान परिषदेतील सदस्या मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गणेश नाईक बोलत होते.

नागपूरमधील (गोरेवाडा) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय येथील प्राण्याचा विषाणूजन्य आजारामुळे मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. बाधित प्राण्यांचे पिंजरे निर्जंतुक करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार मृत प्राण्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.

'सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोंबडीच्या मांसाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत माहिती घेवून निर्णय घेण्यात येईल', अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT