Pune News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur: पाच वर्षीय मुलीचा सेप्टिक टॅंकमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू; मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ

या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gangappa Pujari

मंगेश मोहिते...

Nagpur News: नागपूरात पाच वर्षीय मुलीचा प्लॉटवरील सेप्टिक टॅंकमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ज्योती साहू असं मृतक मुलीचं नाव असून तीला बोलता येत नव्हतं. गुरुवार दुपारपासून ती बेपत्ता असल्यानं तिचा शोध सुरू होता. शोध घेत असतानाच हा मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती साहू ही लहान मुलगी काल दुपारपासून गायब होती. तिला बोलताही येत नव्हते. ज्योती गायब झाल्यानंतर सगळीकडे तिची शोधाशोध करण्यात आली होती. आज सकाळी वडील राजू शाहू हे शोध घेत असताना घरालगत काही अंतरावर अर्धवट प्लॉटचा बांधकाम सेप्टिक टॅंकच्या पाण्यात बुडाल्याने ज्योतीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, ज्योतीला बोलता येत नव्हते आणि ती लहान मुलांसोबत खेळत होती. खेळता खेळता ती टाकीत पडली. मात्र तिचा आवाज आला नाही. या टाक्यात जाळीमध्ये ती अडकली असावी त्यामुळे ती बाहेर न आल्यानं ज्योतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्षाबंधनाच्या दिवशी गरोदर मातेची फरफट; पूल नसल्याने पुरातून कावडीतून जीवघेणा प्रवास

यामाहाचा धमाका! R1 चा लूक अन् धडाकेबाज फीचर्स; भारतात लाँच झाली ऑल-न्यू YZF-R2, किंमत ऐकून हादराल

Brother saves sister life: एक रक्षाबंधन असंही...भावाकडून सर्वात मोठं गिफ्ट; बहिणीला दिलं नवं आयुष्य, भावंडांची कहाणी वाचून डोळ्यांतून टचकन पाणी येईल

Kidney health foods: किडनीला डिटॉक्स करायचंय? हे 7 पदार्थ खाल्ल्याने निघून जाईल सर्व घाण

Stampede: भाजप महापौराच्या रक्षाबंधन कार्यक्रमात चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू, अनेक गंभीर

SCROLL FOR NEXT