Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : २ वर्षांच्या चिमुरड्याचा घराच्या गॅलरीत खेळता खेळता गेला तोल, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

घरात खेळता खेळता तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजय डाफ

नागपूर : नागपुरातून धक्कादायक बातमी हाती आली आहे. घरात खेळता खेळता तोल गेल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर, उप्पल वाडीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात घरात खेळता खेळता गॅलरीतून तोल गेल्याने पाचव्या माळ्यावरून खाली पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेख अहफाज असं मृत चिमुकल्याचे नाव आहे.

कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक नगर, उप्पल वाडीत ही घटना घडली आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या शेख अहफाजच्या मृत्यूमुळे परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra Latest news)

नेमकं काय घडलं ?

कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर, उप्पल वाडीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांचा शेख अहफाज हा इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीत खेळत होता. दोन वर्षांच्या या लेकराचा गॅलरीत खेळता खेळता तोल गेला.

शेख अहफाजचा तोल गेल्याने तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्यानंतर अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने शेख अहफाजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शेख अहफाजला रुग्णालयात दाखल केले, मात्र, शेख अहफाजचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. (Nagpur News In Marathi)

एकुतल्या एक शेख अहफाजचा मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षांच्या शेख अहफाजचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT