Nagpur 3 Leopard And One Tiger Died Due To Bird Flu Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये खळबळ

Nagpur 3 Leopard And One Tiger Died Due To Bird Flu: गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू H5N1 ने झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे सेंटरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू H5N1 मुळे (बर्ड फ्ल्यू) झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आठ दिवसांपूर्वी या वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अवयवांचे नमुने तपासणी करण्यात आले होते. या तपासणी अहवालातून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू H5N1 ने झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिला आहे. हे तिन्ही वाघ चंद्रपूरच्या सेंटरमधून उपचार घेत असताना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वी तीन वाघ आणि एका बिबट्याचा अचानक मृत्यू झाला त्यामुळे गोरेवाडा सेंटरमध्ये खळबळ उडाली होती.

भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेल्या या अहवालानंतर इतर प्राण्यांना लागण होऊ नये, त्यासाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच इतर प्राण्यांना बर्डफ्लूची लागण झाली की नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. H5N1 मुळे वाघाच्या मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलल जात आहे. या घटनेमुळे गोरेवाडा रेस्क्यू सेंटर प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये चंद्रपूरच्या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या वाघांना ३ आठवड्यापूर्वी उपचारासाठी आणण्यात आले होते. हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान या ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. या चौघांचा मृत्यू कसा झाला याचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या अवयवांचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. हा अहवाल समोर आला असून त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे त्यामुळे खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT