Mobile phone  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: मोबाईल खेळण्याच्या नादात १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; नागपूरमधील धक्कादायक घटना

यावेळी नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळला.

Ruchika Jadhav

संजय डाफ

Nagpur News: नागपूर येथून एक हृदयद्रवक घटना समोर येत आहे. मोबाईल ऍपमध्ये दाखवल्यानुसार वागताना एका १२ वर्षीय मुलाला गळफास लागला आहे. यात या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सोमवारी नागपूरच्या क्वार्टर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Latest Nagpur News)

अग्रण्य सचिन बारापात्रे असं १२ वर्षीय दगावलेल्या मुलाचं नाव आहे. त्याचे वडील इलेक्टिकचे काम करतात. क्वार्टर परिसरात हा चिमुकला राहत होता. इथेच समोर त्याचे नातेवाईक चिखले राहत होते. अग्रण्य रोज त्यांच्या घरी खेळण्यासाठी जात होता. मात्र सोमवारी तो खेळण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही.

अग्रण्य छतावर जाऊन खेळत होता. बराच वेळ झाला तो घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला बोलवण्यासाठी चिखले यांच्या घरी गेली. त्यावेळी तो कुठे दिसला नाही त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. यावेळी नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत तो आढळला.

मुलाला अशापद्धतीने पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तात्काळ तेथून खाली घेण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केलं. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार, मोबाई फोनवर खेळताना त्यात दाखवल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करताना अग्रण्यला गळफास लागल्याचे समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT