नागपूर महापालिकेचा स्टेशनरी घोटाळा; 4 रुपयांचा पेन 34 रुपयाला तर... Saam TV
महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा स्टेशनरी घोटाळा; 4 रुपयांचा पेन 34 रुपयाला तर...

चार रुपयांचा पेन 34 रुपयाला...5 हजार रुपयांचा कुलर 59 हजाराला...440 रुपयांच्या कॅल्कुलेटर 785 रुपयांना.

संजय डाफ

नागपूर : चार रुपयांचा पेन 34 रुपयाला...5 हजार रुपयांचा कुलर 59 हजाराला...440 रुपयांच्या कॅल्कुलेटर 785 रुपयांना... हे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र, नागपूर महापालिकेने याच दरात स्टेशनरी साहित्य खरेदी केलं आहे. काँग्रेसचे (Congress) नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक सत्य पुढं आलं आहे. स्टेशनरी खरेदीतून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिकेत झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्तापक्ष आणि प्रशासनानं समित्या तयार केल्या आहेत. मात्र, घोटाळ्यामुळं नागपूर महापालिका चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर (Nagpur) महापालिकेत स्टेशनरी घोटाळा गाजतोय. कोरोना काळात नागपूर महापालिकेला राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून पालिकेने दैनंदिन कामकाजासाठी लागणारे स्टेशनरी साहित्य खरेदी केले. या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला. चार रुपयांचा पेन 34 रुपयांना खरेदी करण्यात आला. 5 हजार रुपयांचा कुलर 59 हजार रुपयांत आणि 440 रुपयांच्या कॅल्कुलेटर 785 रुपयांना खरेदी करण्यात आले. अशाच प्रकारे इतर साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आले आणि यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारात सर्व भ्रष्टाचार पुढं आणला.

महापालिकेने खरेदी केलेले साहित्य

साहित्य खरेदीचा दर बाजारातील दर

कूलर ४० लिटर - ५९ हजार रुपये - ८ हजार २४ रुपये

कूलर १२० लिटर - ७९ हजार रुपये - ८ हजार ४९६ रुपये

डॉट पेन प्रति नग - ९.५० रुपये - १.९५ रुपये

यू पिन प्लास्टिक कोटेड पॅकेट - १९८ रुपये - २२ रुपये

प्लास्टिक फोल्डर बॅग एक नग - १८७ रुपये - १० रुपये

जेल पेन प्रति नग - ३४ रुपये - ४ रुपये

टेबल रायटिंग पॅड प्रति नग - ४ हजार ४५० रुपये - १ हजार ४०० रुपये

कॅशिओ कॅल्कुलेटर प्रति नग - ७८५ रुपये - ४४० रुपये

या प्रकरणी महापौर बोलायला तयार नाहीत. आपली भूमिका आपण सभागृहात मांडू असं ते सांगत आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सत्तापक्ष आणि प्रशासनानं वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमल्या आहेत. त्यामुळं या समित्या एकमेकांना वाचविण्यासाठी तर नाही नं अशी शंका उपस्थित होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजांची जादू चालणार की गोलंदाज गाजवणार वर्चस्व? पाहा कसा आहे कॅनबेरा पिच रिपोर्ट

Crime: कंडक्टरकडून महिला प्रवाशावर बलात्कार, बसमध्ये ओलिस ठेवलं, सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर...

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

आगामी निवडणुकीआधी बड्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल; अटक होणार? पुण्यात खळबळ

Airtel Offer: एअरटेलची बंपर ऑफर! एकदाच रिचार्ज करा अन् मिळवा वर्षभराची सेवा, किंमत किती?

SCROLL FOR NEXT