Nagpur News Sanjay daff
महाराष्ट्र

Nagpur News: नागपूरकरांना पालिकेचा मोठा दणका, महिन्याभरात बेशिस्तांकडून लाखोंचा दंड वसूल

नागपूर महापालिकेने दंड वसुलीचा मोठा विक्रम नोंदवला आहे. एका महिन्यात तब्बल ३० लाखांचा दंड वसूल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur News: बेशिस्त नागपूरकरांना वठणीवर आणण्याचा पवित्रा नागपूर (Nagpur) महापालिकेने हाती घेतला आहे. वारंवार सुचना देऊनही नागपूरकर रस्त्यांवर कचरा टाकतात आणि परिसर खराब करतात. अशात आता नागरिकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या खिशाला चांगलीच कात्री बसलीये. पालिकेने ही दंडात्मक कारवाई सुरू केल्यापासून ५ हजाराहून जास्त नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

नागपूर महापालिकेने दंड वसुलीचा मोठा विक्रम नोंदवला आहे. एका महिन्यात तब्बल ३० लाखांचा दंड वसूल झाला आहे. स्वच्छतेच्या मानांकनात दिसत असलेली घसरण लक्षात घेता महापालिका आता ऍक्टीव मोडवर आहे. त्यामुळे अजूही न सुधारलेल्या नागपूरकरांनी वेळीच स्वच्छतेचे नियम पाळण्याची सवय लावून घ्या. त्याने तुमचा खिसाही सुरक्षित राहील आणि स्वच्छतेच्या नामांकनात नागपूर थोडे पुढे येईल.

नागपूरात रस्त्यावर थुंकणारे, लघुशंका करणारे आणि कचरा टाकणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, अस्वच्छता ठेवणे याने शहराबरोबरच अनेक गोष्टींचे नुकसान होते. यात अनेकदा घाणीचे साम्राज्य वाढल्याने रोगराई देखील पसरते. त्यामुळे नागपूरमध्ये महिन्याभरात ५ हजार ६०३ बेशिस्त नागरिकांकडून दंड वसूल झाला आहे. तसेच अस्वच्छता पसरवू नका असे आवाहन पालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Karanji Recipe : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Maharashtra Nagar Parishad Live : चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडले

Young Stroke Causes: तरुण वयात स्ट्रोक होण्याची कारणं कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT