नागपूर महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली

नागपूर महानगरपालिका निवडणूक (Nagpur Muncipal Corporation Election) अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे.

संजय डाफ

नागपूर महानगरपालिका निवडणूक (Nagpur Muncipal Corporation Election) अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे. या निवडणूकीत भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं (Congress) जोरात तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी नागपुरात काँग्रेसचा अंतर्गत सर्वे सुरु झाला आहे. एक रिपोर्ट कार्ड नगरसेवकांचं तयार केलं जातं आहे. समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना पक्ष घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. मेरिट नुसार पक्षाचं तिकीट दिलं जाणार आहे.

नागपूर महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, आता सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. काम करणाऱ्या उमेदवाराला पक्षाचं तिकीट दिलं जाणार आहे. यासाठी काँग्रेसनं अंतर्गत सर्वे सुरू केला आहे.

या सर्वेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या कामाची माहिती घेणे, नगरसेवकांच्या कामगिरीबाबत मतदारांचं काय मत आहे, शिवाय संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी करण्याचं काम पक्षाकडून केलं जातंय. ‘गेल्या पाच वर्षात समाधानकारक कामगीरी नसलेल्या नगरसेवकांना पक्ष घरचा रस्ता दाखवणार असून, या सर्व्हेच्या माध्यमातून काँग्रेस नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड तयार होतंय.

नागपूर शहरातील १५१ प्रभागात काँग्रेसची उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. नागपूरात काँग्रेस गेल्या १५ वर्षांपासून सत्तेपासुन दूर आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणूकीत सत्ता मिळावी, म्हणून काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT