LSD blotter “sticker drugs” seized by Nagpur Police, raising concerns over rising drug use among college students. saam tv
महाराष्ट्र

'टिकली' ड्रग्जचा विद्यार्थ्यांना विळखा, नागपूरच्या कॉलेजेसमध्ये 'LSD'चा धुमाकूळ

Tiny ‘Tickli’ Drugs, Massive Risk: अभ्यासात फोकस वाढण्याच्या नादात नागपुरात विद्यार्थ्यांना ड्रग्सच्या आहारी लावण्याचा गोरखधंदा सुरुये. टिकली एवढ्या ड्रग्सनं नागपुरकरांना कसं चिंतेत टाकलंय. पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

तुमच्या मुलांच्या हातात खिशात किंवा बॅगेत टिकली एवढी दिसणारी स्टिकर्ससारखी भासणारी वस्तू आहे का हे तपासून पाहा, कारण तो साधा कागद नाही तर ते आहे ड्रग्ज. होय नागपुरला एलएसडी या ड्रग्ससोबत महाविद्यालयीन तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केलीये. एखादं स्टिकर भासावं असं हे ड्रग्स पाहून पोलिसही चक्रावून गेले. टिकली ऐवढ्या आकाराच्या या ड्रग्सला सहज लपवता येणं शक्य आहे. आणि याचा फायदा घेऊन तरुणाईला व्यसनाधीन करणाऱ्यांचं नागपुरात फावतंय. पाहा हे एलएसडी ड्रग्स कसं आहे आणि त्याची किंमत काय.

काय आहे टिकली ड्रग्ज?

नाव - Lysergic Acid Diethylamide (एलएसडी)

स्वरूप - अत्यंत शक्तिशाली सायकेडेलिक ड्रग

किंमत - एका छोट्या डॉटची किंमत तब्बल १० हजार रुपये

विक्री - कागदाच्या लहान पेपरवर किंवा स्टॅम्पसारख्या तुकड्यांत विक्री

आकर्षण - स्मायली किंवा आकर्षक डिझाईनमुळे युवकांना याचं आकर्षण

पोलिसांनी नागपुरात तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीचे हे एलएसडी जप्त केलंय. याचे कनेक्शन आता पुणे आणि मुंबईपर्यंत पोहोचले आहेत. या रॅकेटमधला मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर या ड्रग्ज व्यापाराचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरलेत, हे स्पष्ट होईल.

तपासात समोर आलेली माहिती हादरवून सोडणारीये. कारण नादान विद्यार्थ्यांना हे ड्रग्स घेतल्यामुळे अभ्यासावरचा 'फोकस' वाढतो आणि आपण जास्त वेळ जागं राहू शकतो असं सांगण्यात येत. मात्र यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचं समोर आलंय. टिकली एवढं हे ड्रग्स् कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं पोहोचवले जातं. जिभेखाली ठेवताच त्याचे दिर्घकाळ परिणाम दिसतात. कॉलेज युवकांसाठी घातक असलेलं हे ड्रग्स पोलिसांनी जप्त तर केलं आता या ड्रग्सतस्कारांवर पोलिस कारवाई करतीलही. मात्र आता पालक आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. अन्यथा कॉलेजमध्ये रिफ्रेश होण्याच्या नादात नशामुक्ती केंद्रात रिस्टार्ट करण्याची वेळ येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : हृदयद्रावक! पत्नीच्या निधनाने पतीला बसला धक्का, तेराव्यालाच उचललं टोकाचं पाऊल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, फक्त DA आणि फिटमेंट फॅक्टर नाही, तर फॅमिली फॉर्म्यूलाही वाढवू शकतो तुमचा पगार

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT