Rescue teams at the site of the collapsed under-construction temple gate in Nagpur’s Koradi area. saamtv
महाराष्ट्र

Koradi Temple Gate:नागपुरातील मंदिराचा गेट कोसळला,अनेकजण दबल्याची माहिती

Koradi Temple as Gate Structure Collapses: नागपूरच्या कोराडी भागात बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा गेट कोसळल्याने मोठी दुर्घटना घडलीय. ज्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनासह बचावकार्य सुरू आहे.

Bharat Jadhav

  • नागपूरातील कोराडी मंदिराजवळ निर्माणाधीन गेट कोसळले.

  • बांधकामाचा भाग कोसळून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले.

  • पोलीस व प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले.

  • घटनास्थळी ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्याची दुसरी राजधानी नागपुरात एक मोठी दुर्घटना घडलीय. येथील कोराडी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळलाय. गेटच्या बांधकामाचा एक भाग खाली कोसळला असून त्याखाली अनेकजण दबल्याची भीती वर्तवली जात आहे. नागपुरातील कोराडी मंदिराजवळ गेट उभारण्यात येत आहे. या गेटच्या कामादरम्यान बांधकामाचा एक भाग खाली कोसळला. त्या भागाखाली काही कामगार अडकल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटना घडताच पोलीस विभागासह प्रशासकीय लोक तिथं पोहचले आहेत. प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे.

मंदिराच्या एका भागात निर्माणाधीन स्लॅब कोसळून काही मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोराडी ते मंदिर मार्गावरील गेटचे निर्माणकार्य सुरू आहे. मंदिराच्या गेट क्रमांक ४ जवळ स्लॅबचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने त्याखाली दबून ५ ते ६ मजूर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, कोराडी मंदिराच्या पाठीमागे हे बांधकाम चालू आहे. येथील निर्माणाधीन गेटचा काही स्लॅब कोसळलाय. आतापर्यंत कोणत्याच प्रकारे जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय. परंतु सर्व प्रकारे तपास करण्यात येत आहे. बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी सर्व यंत्रणा दाखल झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT