महाराष्ट्र

Nagpur : नागपुरातील बिझनेसमन अन् पत्नीचा इटलीत मृत्यू, फिरायला गेल्यावर काळाचा घाला

Gulshan Plaza owner Javed Akhtar death news Italy : नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नादिरा यांचा इटलीत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या तिन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Gulshan Plaza owner Javed Akhtar death news Italy : नागपुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक जावेद अख्तर यांचा पत्नीसह इटलीत झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. ५५ वर्षीय जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी ४७ वर्षीय नादिरा गुलशन अशी मृतांची नावे आहेत. तर मुलगी २१ वर्षीय आरजू अख्तर हिची प्रकृती नाजूक आहे, तर दुसरी मुलगी शिफा आणि मुलगा जाजेल हे देखील अपघातात जखमी झाले आहेत. इटलीतील ग्रोसेटोजवळील ओरिलिया महामार्गावर हा अपघात झाला. मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याने स्थानिक हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून माहिती दिली, त्यानंतर नागपुरातील नातेवाईकांना अपघाताची माहिती मिळाली. जावेद अख्तर हे आपल्या कुटुंबिया सोबत पर्यटनासाठी फिरायला गेले होते, त्यावेळी काळाने घाला घातला.

जावेद अख्तर हे नागपूरमधील सिताबर्डी येथील गुलशन प्लाझाचे मालक होते. ते कुटुंबासोबत इटलीला फिरण्यासाठी गेले होते. गुरूवारी सकाळी टस्कनीमधील ग्रोसेटोजवळ एका अपघातात पती-पत्नीचे निधन झाले. त्यांच्या तीन मुलांना - आरझू, झेझेल आणि शिफा यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावेद आणि नादिरा यांचे मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी आणि जखमींची काळजी घेण्यासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क केला. नागपूरचे डीसी विपिन इटनकर यांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि जखमींना आधार देण्यासाठी दूतावासाला तातडीने संदेश पाठवलाय.

नागपूरमधील अख्तर कुटुंब युरोप अन् इटलीमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पण हाच विदेश दौऱ्यात त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुलांच्या डोक्यावरून आई-बापाचे छत नाहीसे झाले. २२ सप्टेंबर रोजी अख्तर कुटुंबियाने फ्रान्सचा दौरा सुरू केला होता. गुरूवारी, त्यांची नऊ आसनी पर्यटकांची मिनी-बस, आशियाई प्रवाशांना घेऊन निघाली. टस्कनमधून सकाळी ऑरेलियाला जायला निघाले होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला अन् मिनी बसचा अपघात झाला.

एका ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्हॅनला आधी धडक दिली, त्यानंतर अख्तर कुटुंब असणाऱ्या मिनी बसलाही जोरात धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चालक, जावेद आणि नादिरा यांचा समावेश होता. २५ वर्षीय आरझू रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. १५ वर्षीय झेझेल आणि २१ वर्षीय शिफा यांच्यावर ग्रोसेटो आणि फ्लोरेन्स येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीला 'या' गोष्टी करणं कधीच आवडत नाही? जाणून घ्या कोणत्या?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

Government Scheme : तरुणांना महिन्याला मिळणार ₹१०००; पंतप्रधान मोदींनी लाँच केली नवी योजना

गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल होणार? अपघातावेळी गौतमी गाडीत होती का? पहाटे नेमकं काय घडलं?

Paneer Lababdar Recipe: घरच्या घरी हॉटेलसारखी बनवा पनीर लबाबदार, झटपट तयार करण्यासाठी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT