Nagpur  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur : नागपुरात धुळवडीमुळे चिकन आणि मटनच्या दुकानात मोठी गर्दी

Nagpur Holi Celebration : मस्त मटनावर ताव मारत नागरिकांना होळी साजरी करायाची आहे. आज रंगपंचमीमुळे मटणाच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मटनाच्या दरात प्रति किलो १०० रुपयाने वाढ झाली आहे

Ruchika Jadhav

Nagpur:

राज्यात सर्वत्र होळीची धामधुम सुरू आहे. नागपुरात धुळवडीमुळे चिकन आणि मटनच्या दुकानात मोठी गर्दी जमा झालीये. मटन प्रेमी मार्केटमध्ये चिकन आणि मटन खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगेत उभे आहेत.

होळीच्या आदल्या दिवशी राज्यात सर्वत्र होलीका दहनाचा कार्यक्रम होतो. यावेळी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. दुसऱ्या दिवशी सर्वजण रंग खेळतात. रंग खेळत असताना यासोबत अनेक व्यक्ती मांसाहार करतात. त्यामुळे आजा बाजारात सर्वत्र मटन विक्री सुरू आहे.

नागपूरकरांनी तर मटन आणि चिकन शॉप बाहेर मोठी रांग लावली आहे. मस्त मटनावर ताव मारत नागरिकांना होळी साजरी करायाची आहे. आज रंगपंचमीमुळे मटणाच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मटनाच्या दरात प्रति किलो १०० रुपयाने वाढ झाली आहे.

मटनाचे भाव वाढले

होळी सणामुळे राज्यात अनेक ठिकाणी मटनच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपुरात मटन ८०० रुपये किलो मिळत आहे. अन्य दिवशी मटन ७०० तर काही ठिकाणी ६५० रुपये प्रति किलो विकले जाते. मात्र धुळवडीमुळे मटन आणि चिकन विक्रेत्यांनी भाव वाढवलेत. भाववाढ झाली असली तरी देखील मटन खरेदीदीसाठी शॉप बाहेर मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

Maharashtra Live News Update : साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT