Nagpur Hit and Run Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Hit and Run : पुण्यानंतर आता नागपुरातही हिट अँड रन; कारचालकाने लहान बाळासह महिलेला उडवलं

Nagpur News : अल्पवयीन मुलाच्या कृत्याने नागगिकांमध्ये संतापाची लाट उसलळीये. हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा अशीच घटना घडली आहे. झेंडा चौकात भरधाव कारने तीन जणांना उडवलंय.

Ruchika Jadhav

पराग ढोबळे, साम टीव्ही

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजे असताना नागपुरात सुद्धा झेंडा चौकामध्ये अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. झेंडा चौकात भरधाव कारने तीन जणांना उडवलंय. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ पसरली आहे. अल्पवयीन मुलाच्या कृत्याने नागगिकांमध्ये संतापाची लाट उसलळीये. हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा अशीच घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणाचा मृत्यू झालेला नाही. मात्र एका लहान बाळासह त्याची आई अन्य गाडीने उडवला गेलेला व्यक्ती जखमी आहे. तिघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी दारू आणि गांजाचंसेवन केलं होतं. नशेत त्यांनी बेदारकपणे पायी जाणाऱ्या तिघांना उडवलं. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांच्याकडून 32 ग्राम आमली पदार्थ जप्त केलेत. यात विदेशी दारूच्या दोन बॉटल देखील सापडल्या आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला तो गजबजलेला परिसर होता. त्या ठिकाणी बेधडकपणे वाहन चालवत तरुण मद्यधुंद अवस्थेत आले होते. फूटपाथवर पाच ते सहा दुचाकी होत्या, त्या दुचाकी नसत्या तर चार ते पाच लोकांचा जीव गेला असल्याचं प्रत्यक्षदर्शी रमेश गिरहे यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलंय.

जखमींची माहिती

सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमिन शेख वसीम शेख (२३ वर्षे), लहान बाळ जोहान शेख वसीम शेख हे तिघेही रस्त्याने जाताना त्यांना उडवण्यात आलं आहे. तर या प्रकरणी सनी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. आज या आरोपीना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT