Hardoi Road Accident  Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur hit and run case : नागूपरमध्ये पुन्हा हिट अँड रन; फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव कारने चिरडले, दोघांचा मृत्यू

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपूरमधील रामझुला हिट अँड रनची घटना ताजी असताना आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. नागपुरातील दिघोरी नाक्याजवळ रविवारी हिट अँड रनची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागपुरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील दिघोरी नाक्याजवळ हिट अँड रनची आणखी एक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बंजारा कुटुंब झोपलं होतं. त्यानंतर भरधाव वाहनाने या बंजारा कुटुंबातील लोकांना चिरडले. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या बंजारा कुटुंबातील एकूण ९ जण झोपले होते. या भीषण अपघातात चार महिला आणि लहान मुले असे एकूण ९ जण झोपले होते. या अपघातात एक महिला आणि पुरषाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणी एका अटक केल्याची माहिती हाती आली आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, कार वेगात होती. कार वेगाने आल्यानंतर घराच्या दिशेने शिरली. या कारमध्ये काही लोक होते. फूटपाथवर ८ ते ९ लोक झोपले होते. तर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे'.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.

दरम्यान, कारमधील लोक दारू प्यायल्याची शंका आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली असून अहवाल येणार आहे. यातील एका आरोपीला अटक केली आहे. भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे. या अपघातात एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीश्रक विजय बीजे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra News Live Updates:विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सुरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्याय यांनी केली भविष्यवाणी

Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT