Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

Nagpur News : नागपूर आणि मध्य प्रदेशात संशयित मेंदूज्वरासारख्या आजारामुळे तब्बल दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दूषित औषधांवरही संशय व्यक्त केला जात आहे. आरोग्य विभाग आणि अन्न-औषध प्रशासन सतर्क झाले आहे.

Alisha Khedekar

नागपूर आणि मध्य प्रदेशात संशयित मेंदूज्वराने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे.

NIV पुणे येथे सर्व नमुने तपासणीसाठी पाठवले असून मृत्यू मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दूषित औषधांमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आरोग्य विभाग आणि अन्न-औषध प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.

नागपूर आणि मध्य प्रदेशात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान बनले आहे. संशयित मेंदूज्वरासारखी लक्षणं असलेल्या तब्बल वीसहून अधिक प्रकरणांत आतापर्यंत दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. यात मध्य प्रदेशातील सहा तर विदर्भातील चार बालकांचा समावेश आहे. आरोग्य विभागासोबतच अन्न आणि औषध प्रशासनही सतर्क झालं असून औषध साठ्यांची तपासणी सुरू आहे.

दहा बालकांचा मृत्यू

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शहर आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत २० ते २२ संशयित मेंदूज्वर प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी वय १ ते १६ वर्षांच्या वयोगटातील दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. विशेषत: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून उपचारासाठी आणलेल्या सहा मुलांचाही यात समावेश आहे.

NIV चे तज्ज्ञ तपासणी करत आहे.

सध्या सर्व संशयित प्रकरणांचे नमुने NIV पुणे येथे पाठवले आहेत. NIV च्या टीमने नागपुरातून सॅम्पल सुद्धा गोळा केले. पण मृतक बालकांचे स्थानिक लॅबमध्ये मेंदूज्वर, चंद्रिका आणि हरपिक्स व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नेमकं कारण समजण्यासाठी NIV चे तज्ज्ञ तपासणी करत आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या मुलांमध्ये सुरुवातीला साधा ताप, सर्दी-खोकला, उलटी आणि मूत्र कमी होणे अशी लक्षणं दिसली. पण काही दिवसांतच प्रकृती झपाट्यानं खालावली आणि रुग्णालयात उपचरादरम्यान मृत्यू झाला.

'अक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम' आजार असण्याची शक्यता

यात आरोग्य विभाग अंतिम निष्कर्षवर पोहचला नसला तरी, हे प्रकरणं 'अक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम' (AES) शी संबंधित असावीत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश मधील बालकांचा मृत्यूमागे औषधांच्या दूषिततेवर संशय व्यक्त केला जात आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सायरफमुळे बालमृत्यू झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. त्यामुळे त्याच औषधांच्या वापराचा तपास नागपुरात सुरू करण्यात आला आहे. दहा निरागस बालकांचा मृत्यूच कारण अद्याप अंधारात आहे. मात्र हा मेंदूज्वर आहे का दूषित औषधांचा परिणाम आहे? हे येणारे अहवालच सांगतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजधानी अन् वंदे भारतच्या तिकीट बुकिंगमध्ये ५०० रूपयांची बचत करायचीय? मग हा ऑपशन एकदा बघाच

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT