Devendra Fadnavis BJP Nagpur Election  AI Image
महाराष्ट्र

MLC Election Result : नागपूर पदवीधरमध्ये भाजपचा गेम? '2' क्रमांकाचा कोहळेंना फटका, भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह

Nagpur MLC Election Result BJP News : नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंच्या पराभवाची चर्चा रंगली आहे. ४ हजार मतपत्रिकांवरील पसंती क्रमांकाचा गोंधळ, १५ हजार अवैध मतं आणि मतांमधील फेरफाराच्या दाव्यांमुळे निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Alisha Khedekar

  • नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंच्या पराभवाची राजकीय वर्तुळात चर्चा

  • कोहळेंच्या नावासमोर '१' ऐवजी '२' लिहिलेल्या सुमारे ४ हजार मतपत्रिका असल्याचा दावा

  • निवडणुकीत तब्बल १५ हजार मतं अवैध ठरल्याची माहिती चर्चेत

रोहित कदम, साम टीव्ही

नागपूर पदवीधर निवडणुकीच्या निकालाची चर्चा अद्याप कायम आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवावरून तर्कवितर्क लढवले जाताहेत. तर दुसरीकडे, स्वतः सुधाकर कोहळेंनीही मतांमध्ये फेरफार झाल्याचा दावा केलाय

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आला आणि भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचा गेम झाल्याची चर्चा रंगली. पहिल्या फेरीत सुधाकर कोहळे 927 मतांनी पिछाडीवर होते. कोहळेंच्या नावासमोर पहिली पसंती दर्शविण्यासाठी '1' लिहिण्याऐवजी काही मतदारांनी '2' हा आकडा लिहिला. अशा मतपत्रिकांची संख्या तब्बल ४ हजार निघाल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे, या निवडणुकीत तब्बल 15 हजार मतं अवैध ठरली. त्यामुळे कोहळेंविरोधात आपल्याच पक्षातील नाराजांनी रचलेलं कटकारस्थान तर नाही ना, अशीही कुजबुज भाजपच्या गोटात सुरू झालीय.

भाजपकडून मतदारांना कोहळेंना पहिली पसंती देण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, या निवडणुकीचं गणित केवळ पहिल्या पसंतीपुरतं मर्यादित नसतं. मतदारांची दुसरी आणि तिसरी पसंतीही अंतिम निकालाच्या प्रक्रियेत महत्त्वाची ठरू शकते.

तर दुसरीकडे, भाजपच्या गोटातील काही जाणकारांनी पक्षाशी पूर्णतः सहमत नसलेल्या मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मते मिळविण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला होता. मात्र, त्यांच्या या रणनीतीला अपेक्षित महत्त्व न दिल्याचंही बोललं जातंय या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत संवाद आणि पक्षाच्या मायक्रोप्लॅनिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा परिषदेचे २५ विद्यार्थी नासा दौऱ्यावर

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

SCROLL FOR NEXT