भंडारा: फरार कुख्यात गँगस्टर (Gangster) आबू खानला (Abhu Khan) भंडाऱ्यातून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. नागपूर (Nagpur Police) झोन चारचे उपायुक्त नुरूल हसन यांच्या नेतृत्वातील टीमने आबूला भंडाऱ्यातून (Bhandara) ताब्यात घेतले आहे. आबू खान विरोधात ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर मोक्का (Maharashtra Control of Organised Crime Act) लावल्यापासून तो अनेक दिवसांपासून फरार होता. जीवे मारण्याची धमकी देणे, मालमत्ता हस्तगत करणे अशा गुन्ह्यांमुळे आबूची दहशत निर्माण झाली होती. (Nagpur gangster Abu Khan arrested from Bhandara; was absconding because of Maharashtra Control of Organised Crime Act)
हे देखील पाहा -
नागपूर जिल्ह्याच्या ताजबाग जवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर अन्य सहा दुकानांवर त्याने बळजबरीने ताबा मिळविला होता. हुसेन यांच्या तक्रारीनंतर आबू आणि त्याचे भाऊ अमजद व शहदाजा खान यांच्याविरोधात मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून आबू फरारच होता. मार्च महिन्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र फरार झाल्यानंतर आबू सातत्याने त्याचे लोकेशन बदलत होता. अमरावती, अहमदाबाद, गडचिरोली इत्यादी ठिकाणीदेखील तो लपला होता. त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून असलेल्या नागपूर पोलिसांनी त्याला भंडारा येथून अटक केली. यात भंडारा पोलिसांची भूमिकाही महत्वाची होती. (Nagpur Gangster Abu Khan Arrested From Bhandara)
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.