Nagpur : डॉ.देवकाबाई बोबडे हत्याकांड; पैशांसाठी सख्ख्या नातूनेच केली आजीची हत्या!
Nagpur : डॉ.देवकाबाई बोबडे हत्याकांड; पैशांसाठी सख्ख्या नातूनेच केली आजीची हत्या! SaamTvnews
महाराष्ट्र

Nagpur : डॉ.देवकाबाई बोबडे हत्याकांड; पैशांसाठी सख्ख्या नातूनेच केली आजीची हत्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : शनिवारी रात्री नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या देवकाबाई बोबडे यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे.  मीतेश पाचभाई असे या आरोपीचे नाव असून तो मृत देवकाबाई बोबडे यांचा नातू आहे. त्यानेच ही हत्या केली असून पैशांसाठी ही हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

हे देखील पहा :

शनिवारी दिवशी सायंकाळ च्या वेळी नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत शहराला हादरून टाकणारी घटना घडली. 78 वर्षीय निवृत्त डाक्टर देवकी बोबडे यांची खुर्चीला हातपाय बांधून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता हत्या करणारा घरचाच असल्याचं पुढे आलं आहे. ही महिला ज्या घरात राहायची त्याच घरी त्यांची मुलगी आणि जावई राहतात त्यांच्याच मुलाने हे दुष्कृत्य केले आहे. आरोपी नातू हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता व त्याला पैशांची गरज होती.

त्याने आजी ला पैसे मागितले मात्र आजी ने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने निर्दयीपणे आजीची हत्या केली असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, पोलीस यात आणखी काही निष्पन्न होते का? याचा सुद्धा तपास करत आहे. या हत्येच्या घटनेने परिसर हादरला असून शहरात हळहळ माजली आहे. पण, पैश्याच्या हव्यासापोटी किंवा गरजे पोटी ज्या आजी च्या अंगाखांद्यावर खेळला, वाढला त्याच नातवाने तिची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे आता नेमका विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT