Nagpur Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Cyber Crime : डिजिटल अरेस्टची भीती; निवृत्त अधिकाऱ्याला २६ लाखांचा गंडा

Nagpur News : व्हिडिओ कॉल करून आयपीएस अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती दाखवली. इतकेच नाही तर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या बनावट सही असलेले अटकेचे पत्र वृद्धास पाठवले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने गंडविण्याचे प्रकार सुरु आहे. अशाच पद्धतीने डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका ८२ वर्षीय सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याला २६ लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागपूरमध्ये घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान पीडित हे सरकारी विभागातून २४ वर्षा अगोदर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना ३० एप्रिल रोजी मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सदर व्यक्ती सायबर क्राईम मधील तथाकथित अधिकारी असल्याची बतावणी करत जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल मनी लॉन्ड्रीग प्रकरणात पीडिताचे एटीएम कार्ड सापडल्याचा दावा केला. 

अटकेबाबत बनावट सही असलेले पत्र 

त्यानंतर दोन दिवसांनी समोरच्यानी वृद्धास व्हिडिओ कॉल करून आयपीएस अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती दाखवली. इतकेच नाही तर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या बनावट सही असलेले अटकेचे पत्र देखील पीडित वृद्धास व्हाट्सअपवर पाठवले. यामुळे संबंधितास हे सर्व खरे असल्याचे वाटले. यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. 

२६ लाख केले वर्ग 
याचा फायदा घेत सायबर गुन्हेगाराने अटकेची भीती दाखवत पीडिताकडून गुंतवणुकीचा तपशील आणि विविध बँक खात्यांची माहिती घेतली. आरोपींच्या सांगण्यावरून त्यांनी एफडी तोडली, तसेच २६ लाख रुपये विविध बँक खात्यावर पाठवले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित वृद्धाकडून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

SCROLL FOR NEXT