File photo Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : फ्लाइटच्या टॉयलेटमधून चाळीस लाखाच्या साेन्याची तस्करी, नागपूर विमानतळावर दाेघे ताब्यात

यंदाच्या वर्षात विमानतळावर दुस-यांदा साेन्याची तस्करी पकडली.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : नागपूर कस्टम विभागाच्या (Nagpur Customs Department) एअर इंटेलिजेंस युनिटने (AIU) विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr Babasaheb Ambedkar International Airport) सुमारे चाळीस लाख किमतीचे सुमारे 700 ग्रॅम सोने (gold) जप्त केले. मुंबईहून नागपूर (Mumbai to Nagpur) गो एअर फ्लाइटच्या (G8-954) (go air flight) केबिन टॉयलेटमधून साेने तस्करी करण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला.

नागपूरचे सीमाशुल्क आयुक्त अभय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीयूष भाटी, अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क, नागपूर यांच्या निर्देशानुसार नागपूर विमानतळाचे सहायक आयुक्त अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकांने कारवाई केली. नागपूर कस्टमच्या पथकाने दोन संशयित प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या पथकाने सुमारे 700 ग्रॅम सोन्याचे साहित्य जप्त केले आहे.

दिपक सोनटक्के, अविनाश पराते, अविनाश खोब्रागडे, राजेश नवलाखे, मनीष पंढरपूरकर, सर्व निरीक्षक या पथकात होते. संशयित प्रवाशांनी चौकशीत फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये साेने लपवून ठेवल्याचे उघड केले. हे विमान मूळ फुकेतहून मुंबईला आले होते. त्यानंतर ते नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे देशांतर्गत उड्डाण म्हणून रूपांतरित झाले. (Breaking Marathi News)

यापुर्वी अशाच पद्धतीने नागपूर कस्टमने गेल्या १० जानेवारीला गुन्हा दाखल करून १.७३ किलो सोने जप्त केले होते. विमानतळावरील सोन्याची तस्करी तपासण्यासाठी आणि रोखण्यासाठी नागपूर सीमाशुल्क सतर्क असल्याचे पुन्हा एकदा गुरुवारी झालेल्या घटनेवरुन समाेर आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Weather Update : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, एकता नगर पाण्याखाली, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Viral Video: पायलटला सलाम! मुंबईच्या मुसळधार पावसात विमानाचे यशस्वी लॅडिंग, थरारक व्हिडीओ पाहिलात का?

Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT